भराव खचून जात चिखलाचे पाणी घुसले विहिरित;यशवर्धन राणेंची नाराजी
*💫कुडाळ दि.१६-:* मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ सत्यम हॉटेल समोरील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, रस्त्याच्या बाजूला घातलेला भराव देखील खचून गेला आहे. तसेच या मातीच्या भरावातून जाणारे चिखलाचे पाणी विहिरीत जात असल्याने विहिरीतील पाणी देखील दूषित झाले आहे. या सर्वाचा मनस्ताप तेथील स्थानिक नागरिकांना होत असून, हायवे ठेकदारा बाबत सामाजिक कार्यकर्ते यशवर्धन राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
