आरोस तिठ्यावर राज्य उत्पादन शुल्क कारवाई

३ लाख ६८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

*💫बांदा दि.१६-:* राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाकडून आज आरोस तिठ्यावर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात कारवाई करण्यात आली. यात तब्बल २ लाख ६८ हजार ८०० रुपयांच्या दारुसह १ लाखांची कार असा एकूण ३ लाख ६८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नदीम अब्दुल रेहमान शेख (वय २२, रा. पावशी, कुडाळ) याला ताब्यात घेण्यात आले. सातार्डा-मळेवाड मार्गावर आरोस तिठ्यावर ही कारवाई करण्यात आली. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली विना नंबर प्लेटची अल्टो मोटार ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, जवान आर. डी. ठाकूर, डी. आर. वायदंडे, चालक आर. एस. शिंदे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे करत आहेत.

You cannot copy content of this page