नांदगांव ओव्हर ब्रिज रस्ता खचला

कणकवली 13 जून (प्रतिनिधी)- मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव तिठा ओव्हर ब्रीज वरील रस्ता पहिल्याच पावसात खचला असून सदर ओव्हर ब्रीज हे आधीपासूनच वाहतूकसाठी नांदगाव ग्रामस्थांनी बंद केला होता तो अद्याप ही बंद आहे. तरीही पहिल्याच पावसात ओव्हर ब्रीज वरील रस्ता खचल्याचे निदर्शनास आले असता नांदगाव शिवसेना शाखा प्रमुख राजा म्हसकर यांनी तात्काळ संबंधित केसीसी कंपनीला संपर्क करुन त्यांना तातडीने त्यावर उपाय म्हणून मलमपट्टी करण्यात आली आहे . एक साईट सर्व्हिस रोड अर्धवट असल्याने एकाच सर्व्हिस रोडने वाहतूक सुरू आहे आणि यातच दोनदा ओव्हर ब्रीज वरील वाहतूक सुरू केली होती मात्र दोन्ही वेळा वाहतूक सुरू झाल्यानंतर अपघात सुरू झाले आणि शेवटी ग्रामस्थांनी ओव्हर ब्रीज वरील वाहतूक बंद केली होती . यामुळे वाहतूक सुरू नसूनही रस्ता खचल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे ‌

You cannot copy content of this page