सावंतवाडी दि.१३ -: सावंतवाडी तालुक्यात आज ३२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात २५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात पांझरवाडा २, सबनीसवाडा २, बाहेरचावाडा १, खासकीलवाडा १, माठेवाडा १ तर ग्रामीण भागात नेतर्डे ३, मळगाव ४, कोनापाल १, सातार्डा ३, बांदा १, मळेवाड १, कवठ्णी १, तळवडे १, सातोसे १, कास २, ओटवणे १, चराठा ३, माजगाव २, माडखोल १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ५६० रुग्ण सक्रिय आहेत.
