*💫कणकवली दि.०८-:* खारेपाटण येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या २५ बेडच्या कोविड केअर सेंटरला खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांनी कोव्हीड सेंटरला लागणारे अत्यावश्यक आरोग्य साहित्य येथील कार्यकर्ते व कर्मचारी वर्गाकडे सुपूर्द केले. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते उदघाटन होऊन कोविड बाधित रुग्णासाठी खुले करण्यात आले आहे. खारेपाटण रामेश्वर नगर येथे उभरण्यात आलेल्या या कोविड सेंटर साठी खारेपाटण गावचे सरपंच तथा ग्राम सनियंत्रण समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत ,रफिक नाईक,महेश कोळसुलकर,संकेत शेट्ये आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील त्यांना मोलाचे असे सहकार्य केले आहे. खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांनी छोटे ऑक्सिजन सिलेंडर – २७, ५ लिटरचे सॅनिटायझर चे ४ कॅन, डेटॉल च्या २ बॉटल,ऑक्सिजन कॉन्सस्ट्रेटर – २ मास्क – ४०० नग, हँडग्लोज – १०० नग, बी पी तपासणी मशीन – १, प्लस ऑक्सिमिटर मशीन – १ आदी आरोग्य विषयक आत्यावश्यक साहित्य आज कोविड सेंटर ला सुपूर्द केले. यावेळी सिंधुदुर्ग डॉक्टर फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.पाताडे, डॉ.प्रसाद मालंडकर,डॉ सुजित कदम,खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक,संकेत शेट्ये,महेश कोळसुलकर तसेच व्यापारी असोसिएशनचे प्रशांत गाठे,खारेपाटण गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मंगेश गुरव,ग्रामपंचयत सदस्य योगेश पाटणकर,महावीर ब्रम्हदंडे आदी पदाधिकारी उवस्थित होते.
खारेपाटण कोविड सेंटरला रुपेश सावंत यांनी दिले अत्यावश्यक आरोग्य साहित्य भेट
