*💫सावंतवाडी दि.०८-:* कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात ठरलेली अनेक रक्तदान शिबिरे रद्द झाल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय मधून देखील वारंवार फोन येत आहेत. रक्तदान करणाऱ्या वयोगटातील अनेक युवकांनी लस घेतल्याने रक्तदाता शोधताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा वेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी रक्ताच नाते जपत आहेत. अथक प्रयत्न करून कमी वेळात रक्तदाते उपलब्ध करुन देत आहे. त्यात आतापर्यंत सलग ३ दिवस O + या रक्तगटाचे ३ रक्तदाते वेगवेगळ्या रुग्णालयमध्ये अॅडमिट असलेल्या रुग्णांना उपलब्ध करुन दिले. आशिष साखळकर, हर्षल भांगले, वैभव कोरडे यांनी हे रक्तदान केल. तर गोवा बांबोळी इथ B + रक्ताची आवश्यकता असताना वैभव दळवी, रोशन राऊळ यांनी गोवा मेडीकल काॅलेज बांबोळी येथे जाउन पुढाकार घेत रक्तदान केल. तसेच ह्या महिन्यांमधील शिबीरातील कार्ड रक्तासाठी गरजू गरीब रुग्णांना वाटप केली. याच प्रमाणे रक्तदाते, आॅक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, मेडीसीनसाठी रुग्णमित्र म्हणून युवा रक्तदाता संघटनेच निस्वार्थी पणे काम सुरु आहे.
*वाढत्या कोरोना प्रादुर्भावातही युवा रक्तदाता संघटना जपत आहे रक्ताचे नाते*
