राजा म्हसकर व प्रफुल्ल तोरस्कर यांनी खासदारांचे लक्ष वेधले_
*💫कणकवली दि.०८-:* नांदगाव परिसरात कोरोना रूग्ण संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर एक रूग्णवाहीका देण्यात यावी अशी निवेदनाव्दारे मागणी नांदगाव शिवसेना शाखा प्रमुख राजा म्हसकर व युवा सेना शाखाप्रमुख प्रफुल्ल तोरस्कर यांनी खास. विनायक राऊत यांच्याकडे केली आहे. कणकवली तालूक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव व प्राथमिक आरोग्य केद्र हे हायवे पासून जवळ व मध्यवर्ती ठीकाणी आहे या केंद्राला जोडून 6 उपकेद्र असून त्यांना जोडून जवळपास 25 च्या आसपास गावे आहेत . तसेच हे आरोग्य केंद्र मुंबई गोवा महामार्गालगतच असल्याने अपघातांच्या वेळी रूग्ण वाहीका तातडीने उपलब्ध होत नाही त्याचप्रमाणे आता कोरोना काळात रूग्णाना ने- आण करण्यासाठी रूग्ण वाहीकेची गरज असून नांदगाव केद्राला २०१२ साली रूग्ण वाहीका देण्यात आली होती ती आता नादूरूस्त असून त्याचे पार्ट सुध्दा मिळणे मुश्कीलीचे झाले आहे . तरी सध्या सर्वत्र कोरोना रूग्ण संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर एक रूग्ण वाहीका देण्यात यावी अशी निवेदनाव्दारे मागणी नांदगाव शिवसेना शाखा प्रमुख राजा म्हसकर व युवा सेना शाखाप्रमुख प्रफुल्ल तोरस्कर यांनी केली आहे.
