*💫मालवण दि.०७-:* असरोंडी हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी श्री. विजय सदाशिव पोईपकर (६९) यांचे आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. असरोंडी हायस्कूल येथे श्री. विजय पोईपकर यांनी सुमारे ३३ वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे आणि इमानेइतबारे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम केले होते. विद्यार्थी प्रिय कर्मचारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
असरोंडी हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी विजय पोईपकर यांचे निधन…
