शिरोडा रोटरी क्लबचा उपक्रम
*💫वेंगुर्ले दि.०७-:* रोटरी क्लब ऑफ शिरोडाच्या वतीने जिव्हाळा अनाथाश्रमाला बेडशीट आणि ब्लॅंकेट भेट देण्यात आले.रोटरी क्लब ऑफशिरोडा यांचे वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. माड्याची वाडी येथील जिव्हाळा सेवाश्रम मधील अनाथ मुले व अनाथ व्यक्तींना थंडीपासून बचाव होण्यासाठी श्री सुरेश बिर्जे जीवन आधार ट्रस्ट द्वारे संचालित माड्याची वाडी पिंगुळी येथील अनाथसेवाश्रमाला 20 ब्लँकेट आणि 10 बेडशीट भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी रोटरी क्लब ऑफ शिरोडाचे अध्यक्ष रो. ऍड. योगेश महाले, सचिव रो. विशाल के., रो. रत्नदीप मालवणकर, रो. भालचंद्र दीक्षित, आणि आता अनाथ आश्रमाचे कार्यकर्ते उपस्थित होते. फोटो: अनाथ आश्रमाला बेडशीट व ब्लॅंकेट देताना शिरोडा रोटरी क्लब पदाधिकारी
