कोविड काळात अॅम्बुलन्स जिल्हाबाहेर रुग्णांना ने-आण करण्यासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवा

माजी आम.परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

*💫कणकवली दि.०७-:* खाणीकर्म शेसफंडातून मिळालेल्या १५ अॅम्बुलन्स व अन्य अॅम्बुलन्स जिल्हयाबाहेर नेण्याकरिता परवानगी देण्यात यावी.१०८ बरोबर नव्याने घेतलेल्या १५ यापैकी ५ रुग्णवाहिका जिल्हयाबाहेर कोविड अती आजारातील रुग्ण नेण्याकरिता वापरण्यात याव्यात . व त्या ५ रुग्णवाहिकांमध्ये १०८ प्रमाणे सिलिंडर ठेवण्यात यावे . व त्या रुग्णवाहिकांत सिलिंडरची माहिती असणाऱ्या तात्पुरत्या स्वरूपाचा कर्मचारी व नर्स नेमून द्यावी त्या ५ रुग्णवाहिकांचा जिल्हा बाहेर कोल्हापूर येथे हॉस्पिटल रुग्णांना ने – आण करण्यासाठी वापर करण्याकरिता आपल्या समितीत निर्णय घेवून कोकण आयुक्तांकडे जिल्हयाबाहेर रुग्णवाहिका नेण्याकरिता कोविड काळापूरते जाण्याची परवानगी घेण्याकरिता प्रस्ताव पाठवावा अशी मागणी मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाहतूक करण्याकरिता १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका जिल्ह्यात १२ कार्यरत आहेत . यापैकी प्रत्येक दिवसाला किमान ३ ते ४ रुग्णवाहीका या कोल्हापूर , गोवा अशाठिकणी रुग्ण पोचविण्याकरिता सातत्याने जात असतात . त्यामुळे सदर रुग्णवाहिकांवर व चालकांवर मोठा ताण पडतो व त्या रुग्णवाहिका सातत्याने सुरू राहिल्या तर नादुरुस्त होवू शकतात.त्याचप्रमाणे कोरोना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता या सर्व रुग्णवाहिका जिल्हा अंतर्गत कोल्हापूर व गोवा याठिकाणी रुग्णांना ने – आण करण्याकरिता वापरत असल्याने अनेक कोविडची लक्षणे असलेल्या रुग्णांना फोन संपर्क केल्यानंतर या रुग्णवाहिका रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याकरिता किंवा हॉस्पिटल मधला सीरियस पेशंट कोल्हापूर , गोवा येथे हलविण्यास काही वेळा ३ ते ५ तास पेक्षा जास्त काळ रुग्णांकडे येण्यास लागत त्यामुळे रुग्णांना त्याचा होतो . त्यामुळे दगावण्याची शक्यता निर्माण होते . त्यावर आपल्याकडून १०८ क्रमांकाच्या १२ रुग्णवाहिका कोल्हापूर व गोवा याठिकाणी ने – आण करण्याकरिता वापरण्यात यावे . अन्यथा आपल्याकडे नव्याने आलेल्या १२ रुग्णवाहिका व कणकवलीच्या आमदारांनी दिलेल्या ३ रुग्णवाहिका या १५ रुग्णवाहिकांपैकी १० रुग्णवाहिका जिल्हाअंतर्गत रुग्ण आणण्याकरिता ऑक्सिजन सिलिंडर सहित वापरण्यात याव्या . त्या रुग्णवाहिकांमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोविड रुग्ण जिल्हया रुग्णालयात , उपजिल्हा रूग्णालयात व त्या त्या तालुक्यातील कोविड सेंटरवर आणण्याकरिता व सर्व रुग्णालयांकडे असलेल्या पूर्वीच्या जुन्या रुग्णवाहिका यांचा वापर करावा . अन्यथा १०८ बरोबर नव्याने घेतलेल्या १५ यापैकी ५ रुग्णवाहिका जिल्हयाबाहेर कोविड अती आजारातील रुग्ण नेन्याकरिता वापरण्यात याव्यात . व त्या ५ रुग्णवाहिकांमध्ये १०८ प्रमाणे सिलिंडर ठेवण्यात यावे . व त्या रुग्णवाहिकांत सिलिंडरची माहिती असणाऱ्या तात्पुरत्या स्वरूपाचा कर्मचारी व नर्स नेमून द्यावी त्या ५ रुग्णवाहिकांचा जिल्हा बाहेर कोल्हापूर येथे हॉस्पिटल रुग्णांना ने – आण करण्यासाठी वापर करण्याकरिता आपल्या समितीत निर्णय घेवून कोकण आयुक्तांकडे जिल्हयाबाहेर रुग्णवाहिका नेण्याकरिता कोविड काळापूरते जाण्याची परवानगी घेण्याकरिता प्रस्ताव पाठवावा व परवानगी मिळाल्यानंतर सदर रुग्णवाहिकेचे १०२ क्रमांकावर उपलब्ध असल्याबाबतची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात यावी . व तशाप्रकारची प्रसिद्धी वृत्तपत्रातून देण्यात यावी जेणेकरून गरजू व गरीब रुग्णांना अॅम्बुलन्सधारकांकडून गरजू रुग्णांकडून भरमसाट पैसे घेवून होणारी लुट थांबवता येईल . गरीब व गरजू रुग्णांना कोल्हापूर येथे उपचारासाठी जाणे मोफत होईल .व अन्य रुग्णवाईका त्या ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात ने – आण करताना कोविड आजारातील रुग्णांना मोफत सवलत देण्यात यावी व त्याकरिता लागणारा डिझेल है आपत्कालीन विभागाकडून कोविड आजारातील निधी घेण्यासाठी मागणी करावी . अशी मागणी मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page