जास्मिन लक्ष्मेश्वर, राकेश चितारी यानी केले आज वाटप
*💫सावंतवाडी-:* राष्ट्रीय कॉंग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर व सावंतवाडी राष्ट्रीय कॉंग्रेस शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना पेशंटच्या नातेवाईकांसाठी दररोज काँग्रेस थाळी हा उपक्रम सुरू करण्यात आलेली आहे. आज दिनांक ७ जुन रोजी बाहेरचावाडा येथील सोशल मीडिया सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्वर व राकेश चीतारी यांच्या हस्ते कॉंग्रेस थाळी चे वाटप करण्यात आले आहे.
