⚡बांदा ता.०२-: गांधी चौक बांदा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी दर्पण आळवे, उपाध्यक्षपदी चेतन मुंगी, सचिवपदी ज्योतिनंद कुंभार, तर खजिनदारपदी धनेश नाटेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आगामी ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष राकेश केसरकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदार यांच्यासह माजी अध्यक्ष राकेश केसरकर, बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रसाद वाळके, भाऊ वाळके, प्रशांत पांगम, नीलेश ऊर्फ पापू कदम, ओंकार नाडकर्णी, प्रथमेश गोवेकर, राकेश वाळके, सुशांत पांगम, युवराज वाळके, अर्णव स्वार, मयुरेश महाजन, प्रियेश नाटेकर, अक्षय नाटेकर, अनिल नाटेकर, अमर गोवेकर, संदेश पावसकर, अनिकेत येडवे, वल्लभ पडते, मंदार महाजन, अक्षय मयेकर, अजिंक्य पावसकर, नितेश नाटेकर, मंथन विरनोडकर, नील भिसे, पार्थ पावसकर, सिद्धेश शिरोडकर, रुद्र वाळके आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवरात्रोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ऑक्टोबरला दुर्गामातेचे आगमन, १२ ऑक्टोबरला दशावतारी नाट्यप्रयोग, १३ व १४ ऑक्टोबरला दांडिया स्पर्धा, तर १५ ऑक्टोबरला महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा बहारदार कार्यक्रम होणार आहे. १६ ऑक्टोबरला स्थानिक भजनी बुवांच्या डबल बारी भजनाचा सामना, १७ ऑक्टोबरला फॅन्सी ड्रेस व रेकॉर्ड डान्स ग्रुप डान्स स्पर्धा, १८ ऑक्टोबरला प्रसिद्ध भजनी बुवांच्या २०/२० डबल बारी भजनाचा सामना, १९ ऑक्टोबरला गोव्यातील नामांकित ऑर्केस्ट्रा व विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव आणि २० ऑक्टोबरला देवीची ढोल पथकाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दरम्यान, मंडळातर्फे ‘रिल्स स्टार’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. गांधी चौक नवरात्रोत्सव मंडळाच्या फेसबुक पेजवर या स्पर्धेसाठी रिल्स पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून, प्रथम ते समाप्तीदरम्यान प्राप्त झालेल्या रिल्सपैकी विजेत्या रिल्सची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेत केवळ गांधी चौक मंडळाशी संबंधित रिल्स व लाईक यांचा समावेश असणे बंधनकारक आहे.
फोटो:-
बांदा येथे आयोजित मंडळाच्या बैठकीत दर्पण आळवे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

