अनंत भाटे:नट वाचनालयात महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी..

⚡बांदा ता.०२-: महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाचा मार्ग दाखविला, तर लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला. या महापुरुषांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन अनंत भाटे यांनी येथे केले.
बांदा येथील नट वाचनालयात महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, मिलिंद महाजन, संचालिका स्वप्नीता सावंत, प्रमुख वक्ते अनंत भाटे, प्रवीण परब तसेच ग्रंथपाल सौ. सुस्मिता नाईक उपस्थित होते.
यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. गांधीजींच्या सत्य व अहिंसेच्या विचारांसह शास्त्रीजींच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेचे महत्त्व उपस्थितांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव राकेश केसरकर यांनी केले. सहसचिव हेमंत मोर्ये यांनी आभार मानले. यावेळी वाचक उपस्थित होते.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात आयोजित महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर.
