बांदा/प्रतिनिधी
वाचनप्रेरणा दिनानिमित्त प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समस्त नेरुरकर परिवार पुरस्कृत खुल्या वाचक स्पर्धेचे आयोजन नट वाचनालयात गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांपुरती मर्यादित आहे. स्पर्धेसाठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर व व. पु. काळे यापैकी कोणत्याही एका साहित्यिकाच्या कोणत्याही पुस्तकावर परिक्षणात्मक बोलायचे आहे. त्यासाठी स्पर्धकांना १० मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी शनिवार दिनांक १० ऑक्टोबर पर्यंत ९४०५५७०३४९ या मोबाईल क्रमांकावर आपली नावे नोंदवावीत. साहित्यप्रेमींनी या खुल्या वाचक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन नट वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

