कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते उद्घाटन.
*💫कणकवली दि ०५-:* कणकवली तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कलमठ ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण रहावे यासाठी ४० बेडचा ग्राम विलगीकरण कक्ष येथील कलमठ कुंभारवाडी आणि बाजारपेठ शाळा याठिकाणी सुरु करण्यात आले आहेत.या कक्षांचे कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी ड़ॉ संजय पोळ, जि.प. सदस्या स्वरूपा विखाळे, पं.स. सदस्य महेश लाड़, मिलिंद मेस्त्री, उपसरपंच वैदेही गुडेकर,ग्रा.पं सदस्य संदिप मेस्त्री, मंडळ अधिकारी नागावकर, स्वप्निल चिंदरकर, राजू राठोड, विनायक मेस्त्री, सचिन बांदिवडेकर, सायली पवार, श्रद्धा कदम, हेलन कांबळे, ग्रामविकास अधिकारी विश्वास पावसकर, केंद्र प्रमुख शुभांगी दळवी,उपमुख्याध्यापिका मीनल खानोलकर ,तलाठी श्रध्दा कोरगावकर, आरोग्य सेवक चंद्रमणी कदम, पोलिस पाटिल संतोष जाधव, शमिता बिरमोळे, श्री लिमये, विलास गुडेकर,जीतू कांबळे, निसार शेख,परेश कांबळी व अन्य उपस्थित होते
