*💫कणकवली दि.०५-:* कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कणकवली येथील तेलीआळी, हर्णेआळी येथे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. कणकवली शहराबरोबरच तालुक्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे या पार्श्वभूमीवर गतवर्षी ज्याप्रमाणे सॅनिटायझर, मास्क वाटप यासारखे उपक्रम या वर्षी अत्यंत कमी प्रमाणात राबविले जात आहेत . त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कणकवली येथे सॅनिटायझर फवारणी करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. मनसेच्या वतीने तेलीआळी, हर्णेआळी येथे सिॅनिटायझर फवारणी करण्यात आली. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शांताराम सादये, प्रशांत उपरकर, संतोष कुडाळकर,दीपेश कुमार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवलीत मनसेने केली सॅनिटायझर फवारणी…
