सावंतवाडीत आज घडलेल्या प्रकाराला रूपेश राऊळ यांनी राजकीय दिशा देवू नये

संजू परब यांना गुंतवून वातावरण खराब करु नये;भाजपच्या निशांत तोरसकर यांचा सल्ला

*💫सावंतवाडी दि.०४-:* शहरातील आजच्या प्रकरणाला शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी राजकारणाची दिशा देऊन शहरातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नये. असा सल्ला भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य निशांत तोरसकर यांनी रुपेश राऊळ यांना दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, आज शहरात घडलेला प्रकार हा निव्वळ गैरसमजातून झाला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू अथवा गुंडगिरी पसरविण्याचा उद्देश नव्हता. यातील दोन्ही व्यक्ती या शहरातील प्रतिथयश व्यवसायिक कुटुंबातील आहेत. हा विषय शिव उद्यान समोरील जागेत पार्किंग करण्यावरून झाला असून, बोलचालीचे रूपांतर वादावादीत होऊन हातघाईवर गेले. यात कोणतेही पूर्वनियोजित कारण नव्हते. असे तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, उद्यानासमोरील पार्किंग हा सावंतवाडी नगरपरिषदेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या विषय असून, भविष्यात यासारखे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी तेथील खाजगी पार्किंग त्वरित बंद करण्यात यावे आणि बाहेरील बाजूस गेट लावण्यात यावे अशी विनंती त्यांनी यावेळी मुख्याधिकारी यांना केली आहे. तसेच यावेळी त्यानी या प्रकरणात नगराध्यक्ष संजू परब यांना गुंतवून शहरातील वातावरण खराब करू नये. अशी विनंती करत, आजच्या घडलेल्या प्रकारावेळी ते स्वतः त्या ठिकाणी पोहचून मध्यस्ती करून प्रकरण पुढच्या थराला जाणार नाही याची काळजी घेतली होती. असे ते प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page