शिवस्वराज्य दिन कोरोना नियम पाळून साजरा करा :मनोज रावराणे…

*💫कणकवली दि.०४-: शासनाने 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत , पंचायत समिती व जिल्हा परिषद या कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन ” म्हणून साजरा करणेचे शासनाचे आदेश दिले आहेत .त्यानुसार 6 जून रोजी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुडी उभारून त्यास अभिवादन करावे असे आदेश प्राप्त झाले असून तालुक्यात शिवस्वराज्य दिन कोरोना नियम पाळून साजरा करावा असे आवाहन कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांनी केले आहे. या शासनाने दिलेल्या सुचनांप्रमाणे कणकवली तालूक्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर शिवस्वराज्य दिन – कोरानाचे सर्व नियम पाळून उत्साही वातावराणात साजरा करणेत यावा असे आवाहन कणकवलीत पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांनी केले आहे

You cannot copy content of this page