जि. प.अध्यक्षा संजना सावंत यांनी केले वितरण;असलदे विलगिकरण कक्षाचे उद्घाटन
*💫कणकवली दि.०४-:* असलदे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महीला बचत गटांना हळद वाटप जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आले.तसेच असलदे ग्रामपंचायतीच्या विलगिकरण कक्षाचे असलदे मधली वाडी प्रशालेत उद्घाटन करण्यात आले एकूण २५ महीला बचत गटांना ३०० किलो हळदीचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नांदगाव पं. स. सदस्या सौ हर्षदा वाळके, असलदे सरपंच पंढरीनाथ वायंगणकर, उपसरपंच संतोष परब,पत्रकार नरेंद्र हडकर , सो.सा.चेअरमन प्रकाश परब, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबाजी शिंदे, ग्रामसेवक आर .डी सावंत,कोळोशी ग्रामसेवक मंगेश राणे , ग्रामपंचायत सदस्य दिनकर दळवी,दिनेश तावडे, रघुनाथ लोके, संचिता नरे, वंदना हडकर , निलिमा तांबे, प्रतिभा खरात पोलिस पाटील सावित्री पाताडे, आदी उपस्थित होते असलदे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हळद लागवड करावी यासाठी हळदीचे वाटप होत आहे खरोखरच एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असून माझ्या कडून जे जे सहकार्य तुम्हाला अपेक्षित असेल तेव्हा तुम्ही आम्हाला हाक द्यावी त्या हाकेला प्रतिसाद देवून सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे जि. प.अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी सांगितले.असलदे गावाने कणकवली तालुक्यात आदर्शवत काम उभे केले असल्याने सरपंच पंढरी वायंगणकर व ग्रामपंचायतीचे कौतुक केले आहे. यावेळी महींद्रा कंपनी चे सूबोध मोरये यांनी फेस शिल्ड दिली होती याचे वितरणही करण्यात आले आहे. तसेच असलदे ग्रामपंचायतीच्या विलगिकरण कक्षाचे असलदे मधली वाडी प्रशालेत उद्घाटन करण्यात आले त्याचप्रमाणे असलदे गावात कोरोना लसिकरण केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले असून आज ४५ वर्षा वरील ५० जणांचे लसिकरण करण्यात आले आहे.
