*शेर्ले येथील कोविड सेंटर मध्ये अंडी, फळे, मास्क आणि सॅनिटायझरचे केले वाटप*
*💫बांदा दि.०३-:* जिल्हा परिषद मडुरा नं. २ शाळेतील प्राथमिक शिक्षक श्री संदीप सदाशिव निऊंगरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले येथील डिवायझीन मर्सिज येथील कोवीड सेंटरमधील पेशंटना अंडी, फळे, मास्क, सॅनिटायझर या साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला. यावेळी मडुरा गावचे तलाठी विजय कविटकर, मडुरा नं १ शाळेच्या मुख्याध्यापिका सायली राऊळ उपस्थित होत्या. संदीप निउंगरे यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करून कोवीड सेंटरला दिलेल्या या मदतीबद्दल कौतुक करण्यात येत आहे.
