जिल्हा परिषद सदस्या संपदा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन*
*दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यात ग्रामिण भागात कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. शासनाने गृह अलगीकरण करायला बंदी घातली आहे त्यामुळे आता गावातील ग्रामस्तरीय समिती मार्फत गावातील बंद असलेल्या शाळा आता कोविड सेंटर सुरू करुन संस्थात्मक ग्राम अलगीकरण कक्ष सुरू करायला सुरुवात केली कुंब्रल शाळा येथील कक्षाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ संपदा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार अरुण खानोलकर, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, नायब तहसीलदार एन. एन. देसाई, कोतवाल, अनिल सावंत, मंडळ अधिकारी राजन गवस, संदेश देसाई, तलाठी शेख तसेच आरोग्य केंद्र तळकट येथील कर्मचारी उपस्थित होते.
