*💫कणकवली दि.०३-:* कणकवली शहरातील मारुतीआळीमधील हॉटेल व्यावसायीक गजानन उर्फ गजा मधुकर नार्वेकर ( ५९ ) यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले . मूळ कुडाळ तालुक्यातील माणगांव – नानेलीचे गजानन नार्वेकर हे व्यवसायानिमित्त कणकवलीत स्थायीक झाले होते .कणकवली येथील भालचंद्र हॉटेलचे मालक समीर ( मुन्ना ) , भालचंद्र ( चिंटू ) यांचे ते वडील हो गेल्या काही वर्षांत त्यांनी हॉटेल व्यवसायात जमही बसविला होता. तालुक्यात कॅटरिंग व्यवसायात त्यांचे नाव होते. मनमिळावू , गरजूंच्या मदतीला धावणाऱ्या स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे असा परिवार आहे .
कणकवली मारुतीआळीतील हॉटेल व्यावसायीक गजानन नार्वेकर यांचे निधन…
