सरपंचांना येणाऱ्या अडचणींबाबत आम.नितेश राणे यांनी घेतला आढावा

कोरोना पार्श्वभूमीवर कणकवलीत बैठक

*💫​कणकवली दि.०३-:* कणकवली तालुक्‍यातील सरपंचांचे शंभर टक्के कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करणार असल्याचे सांगतानाच कोरोनाच्या पाश्वभूमिवर तालूक्यातील कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव व ग्रामविलगीकरण कक्ष स्थापन करण्याबाबत झालेल्या शासन आदेशानुसार स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या तालूक्यातील सरपंचांना येणाऱ्या अडीअडचणी व निर्माण झालेले प्रश्न याचा आढावा आम. नितेश राणे यांनी घेतला. आम. नितेश राणे यांचे अध्यक्षतेखाली तालुक्यातील सरंपचांची बैठक पं.स कणकवली चे प.पू भालचंद्र सभागृहात घेणेत आली . सदर बैठकीस जि. प.अध्यक्ष संजना सावंत, सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, सदस्य मिलींद मेस्त्री , महेश लाड, अरूण चव्हाण गटविकास अधिकारी अभिजीत हजारे, डॉ. संजय पोळ , सुर्यकांत वारंग, संतोष कानडे आदी उपस्थीत होते. कोरोनाची दुसरी लाट रोखण्याच्या दृष्टिने सरपंचांचे अडचणी बाबत चर्चा करणेत आली. यामध्ये सर्वांनी आपल्याला येणाऱ्या अडचणींबाबत सवीस्तर कथन केले .यामध्ये ​१५ व्या वित्त आयोगामधून ​२५ टक्के निधी खर्च करणेच्या शासनाचे आदेश आहेत. परंतू मंजूर आराखडयामध्ये या कामांचा समावेश नाही.तसेच कमीत कमी ​३० बेड झाल्यास सदरचा निधी खर्च करता येणार आहे . त्यामुळे यामध्ये स्पष्ट आदेश नाहीत. सदरचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याबाबत आमदार राणे यांनी निर्देश दिले. तसेच सदरचे विलगीकरण करताना ग्रामिण भागात आरोग्य सहाय्यक ही पदे मोठया प्रमाणात रीक्त असल्याचे निदर्शनात आणण्यात आले. यामध्ये सदरची पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत कार्यवाही करणेबाबत वरीष्ठ स्तरावर तात्काळ कळवण्याचे आदेश दिले.याबबात जि.प ने तात्काळ कार्यवाही करणेबाबत निर्देश दिले . सरपंचाना विमा कवच योजना देणेबाबत घोषणा केली परंतू अदयाप प्रत्यक्ष कार्यवाही नाही याबाबत तात्काळ कार्यवाही करणेबाबत पाठपुरावा सुरू आहे.तसेच आपणही याबाबत प्रयत्नशिल असल्याचे सांगीतले . पुरेशी ऍम्बूलन्स सेवा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी विभाग निहाय तालूक्यात प्राप्त ​११ ऍम्बूलन्स चे नियोजन तालूका आरोग्य अधिकारी यांनी करावे व ​२४ तास ऍम्बूलन्स ची सेवा उपलब्ध करून रूग्णांच्या सेवेत ठेवावी असे निर्देश दिले . स्वॅब घेतल्यानंतर वेळेवर अहवाल येत नाहीत त्यामूळे मोठा प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दा मांडण्यात आला.तसेच विलगीकरणामध्ये जर बेड अथवा इमारत तसेच आर्थिक अडचणी येत असल्यास नाटळ मतदार संघाच्या धर्तीवर विभागानिहाय एकाच ठीकाणी विलगीकरण कक्षाची स्थापना करावी व त्याठीकाणी सर्व सोयी सुवीधा रूग्णांना उपलब्ध करून दयाव्यात अशा सुचना दिल्या . ​​

You cannot copy content of this page