सावंतवाडीत आज पुन्हा रॅपिड टेस्टमध्ये ९ बाधित

*💫सावंतवाडी दि.०३-:* शहरात रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह मिळणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरासाठी ही चिंतेची बाब आहे. आज करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये तब्बल ९ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामध्ये माजगाव येथील एकाच कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. याबाबतची माहिती नगरपालिकेचे डॉक्टर उमेश मसुरकर यांनी दिली आहे. शहरांमध्ये दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने बाहेर पण नाही धोक्याचे बनले आहे गेल्या चार दिवसांमध्ये 25 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, आज शहरांमध्ये तब्बल 87 जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यामध्ये नऊ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी दोघे शहरातील असून उर्वरित सात जण हे ग्रामीण भागातील आहे. माजगाव येथील एकाच कुटुंबातील पाच जणांची टेस्ट केली असता त्यातील चौघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला. आजची आकडेवारी लक्षात घेता कोरोनाचा फैलाव सर्वत्रच झाल्याची भीती अनेकांकडून व्यक्त करण्यात आली. सावंतवाडी नगर परिषदेमार्फत गेले चार ते पाच दिवस ही मोहीम राबवण्यात येत असूनही विनाकारण फिरणार यांच्या संख्येमध्ये काही फरक नसल्याचे दिसून येत आहे सुरुवातीला रॅपिड टेस्टला घाबरुन काहीजण बाजारात येण्यास धजावत असत मात्र सकाळच्या वेळी बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता ही भीती राहिली नसल्याचेच दिसून येत आहे.

You cannot copy content of this page