पशुचिकित्सा व्यवसायिक संघटनेच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन

*पशुचिकित्सक व्यवसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. पेंडुरकर यांचा इशारा*

*💫मालवण दि.०३-:* पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्या ची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य शासनाला १० जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. वेतनस्तरावर सुधारणा करण्यात यावी ग्रामसेवक कृषी सहायकांच्या धरतीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता मंजूर करावा अशी सूचना २७ आँगष्ट २००९ रद्द करून सुधारित अधिसूचना निर्गमित करावी. पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाइन वर्कर घोषित करून विमा सुरक्षा कवच व आवश्यक सेवेतील सुविधा मिळाव्यात, पशुधन विकास अधिकारी गट व पदोन्नती संदर्भातील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर येथील प्रलंबित याचीके संदर्भात पाठपुरावा करावा, राज्य स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, राज्यात बारावीनंतर तीन वर्षाचा पशुधन पशुसंवर्धन विषयक पदविका अभ्यासक्रम सुरु करावा, पशुधन पर्यवेक्षक ते सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदोन्नतीची प्रकरणे दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत ती प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावीत. राज्य शासन अंतर्गत कार्यरत सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदांचा विभागणीहाय असमतोल दूर करावा आदी मागण्या संघटनेच्या असून याबाबत शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पशुचिकित्सक व्यावसायिक संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष डॉ उमेश पेंडूरकर,सरचिटणिस डॉ दिपक माईनकर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

You cannot copy content of this page