राजन तेली यांना पत्र प्राप्त
*💫कणकवली दि.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात ऑक्सीजन बेडसह कोअर सेंटर उभारण्यासाठी भाजपाने प्रस्ताव ठेवला होता.या या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी हे मंजूलक्ष्मी यांनी तीन विधानसभा मतदार संघात समर्पित कोविड हेल्थ सेंटर उभाण्यासाठी जागा निश्चित केली आहे. देवगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह ,मालवण येथील पॉलीटेक्निक मुलांचे वसतिगृह व सावंतवाडी येथील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथे हे कोविड सेंटर उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. याठिकाणी या ठिकाणी ऑक्सिजनसह 30 बेड असणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती कोरोंना रुग्ण संख्या आणि वाढता मृत्यु दर लक्षात घेता सद्य स्थितीत उपलब्ध असणारी व्यवस्था फारच अपुरी आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निहाय ३ कोविड सेंटर भाजपा तर्फे उभारून देण्याचे ठरले आहे.या कोविड सेंटरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. तौक्ते चक्रीवादळानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सिंधुदुर्ग दौरादरम्यान झालेल्या बैठकीत कोरोंना स्थितीचा आढावा घेत असताना हा निर्णय घेण्यात आला होता. या मागणी नुसार मा.जिल्हाधिकारी , तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी सदर जागा निश्चित केल्या आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आहे . आजअखेर कोरोनाचे २७०८२ रुग्ण बाधित असून सध्यस्थितीत उपचाराखालील असलेल्या रुग्ण ५९२० आहे . दररोज साधरण ३०० ते ५०० नविन पॉझीटिव्ह रुग्ण आढळत आहे . तरी जिल्हयातील बाधित रुग्ण संख्या विचारात घेता देवगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह ,मालवण येथील पॉलीटेक्निक मुलांचे वसतिगृह व सावंतवाडी येथील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथे समर्पित कोविड हेल्थ सेंटर उभारावे असे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एच.पाटील यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना दिले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी तीन कोविड सेंटर भाजपाच्या माध्यमातून उभारण्याचे निश्चित झाले आहे
