निलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषि संस्था अध्यक्ष तोरसकर यांची मागणी
*💫मालवण दि.०३-:* मिथीलिन ब्ल्यू’ या औषधाचा वापर कोरोना रोखण्यासाठी तसेच कोरोना पश्चात गुंतागुंत कमी करण्यासाठी प्रभावी औषध म्हणून पुढे आले आहे. त्यामुळे माफक दरात उपलब्ध असलेली मिथिलीन ब्ल्यू उपचार पद्धती सरकारच्या कोरोना औषधोपचार उपचार पद्धती मध्ये समाविष्ट होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत अन्यथा आवश्यक वाटल्यास जनजागरण करून जन आंदोलन उभारले जाईल, असा इशारा निलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मध्ये गेला आहे. विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती व संस्था यांच्याकडून उपचार पद्धती बाबत संशोधन व प्रयोग होत आहे. यातील एक उपचार पद्धती म्हणून ‘मिथीलिन ब्ल्यू’ या औषधाचा वापर कोरोना रोखण्यासाठी तसेच कोरोना पश्चात गुंतागुंत कमी करण्यासाठी प्रभावी औषध म्हणून पुढे आले आहे. हे औषध अतिशय माफक दरात उपलब्ध आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. सदर औषध विविध रुग्णालयात उपचार पद्धती मध्ये वापरले जात आहे. परंतु कोरोनाचा समाजात होणारा प्रसार थांबण्यासाठी ‘मिथीलिन ब्ल्यू’ हे औषध सरकारच्या कोरोना औषधोपचार उपचार पद्धती ( Government medical protocol) मध्ये समाविष्ट होणे गरजेचे आहे. जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यातील सरकारी यंत्रणा सर्व नागरिकांपर्यंत हे औषध पोहचू शकेल. ‘मिथीलिन ब्ल्यू’ हे औषध कोरोना प्रति बंधात्मक, कोरोना बाधीत रुग्णांना, तसेच कोरोना पश्चात गुंतागुंत टाळण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मधून ग्रीन झोन मध्ये न्यायचा असेल तर Government medical protocol मध्ये याचा समावेश आवश्यक आहे. औषध कंपन्याचे सरकारच्या सार्वजनिक आरोग्य धोरणात असलेले अर्थपूर्ण हस्तक्षेप बघता, कोणतेही दडपण न घेता सदरची माफक दरात उपलब्ध असलेली मिथीलिन ब्ल्यू उपचार पद्धती बाबत केंद्र व राज्य सरकारने तातडीची पाऊले उचलावीत अन्यथा जन जागरण करून जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा रविकिरण तोरसकर यांनी दिला आहे. मिथीलिन ब्ल्यू हे अत्यावश्यक औषध किंमत नियंत्रण कायद्याखाली आणावे, जेणे करून औषध कंपन्या प्रमाणा बाहेर नफेखोरी करून सर्व सामान्य रुग्णाची लुबाडणूक होऊ नये. येत्या दोन दिवसात मिथीलिन ब्ल्यू’ टास्क फोर्स सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी विविध सामजिक संस्था, लोकप्रिनिधी, राजकीय पक्षाचे पदधिकारी, सामजिक कार्यकर्ते तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणारे तज्ञ यांच्याशी चर्चा सुरू आहे. तरी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून शासनाने योग्य पाऊले तातडीने उचलावी अन्यथा जन आंदोलन ला पर्याय उरणार नाही, असेही रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.
