अखेर राज्यात बारावीची परीक्षा रद्द, ठाकरे सरकारची मोठी घोषणा

मुंबई, 03 जून : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. आधीच  सीबीएसई (CBSE) बोर्डाची 12 वीची परीक्षा केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ आता महाविकास आघाडी सरकारने सुद्धा राज्यात 12 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर बारावीच्या परीक्षा घेण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. अखेर, राज्य सरकारने दहावीपाठोपाठ आता बारावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

You cannot copy content of this page