कारागृहातील कैद्यांना कोरोना संसर्ग होण्यामागची कारणमीमांसा व्हावी:भाई चव्हाण…

*💫कणकवली दि.०३-:* महाराष्ट्रातील सर्वं कारागृहात असलेल्या ७० हजार कैद्यांपैकी ४ हजारजणांच्या कोरोना चाचण्या सकारात्मक आल्या असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे आज विविध वाहिन्यांवर देण्यात आली आहे. बंदिस्त वातावरणात असलेल्या या कैद्यांना कारागृहामध्ये कोरोनाचा संसर्ग कसा झाला याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तरी सत्य बाहेर येण्यासाठी या घटनेची सखोलपणे कारणमीमांसा व्हायला हवी, अशी मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश संघटक, जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी केली आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे चव्हाण यांनी ही मागणी केली आहे.कारागृहातील कैदी हे चार चौकटीच्या आंत बंदिस्त वातावरणात कायम असतात. कोरोनाचा संसर्ग हा कोरोना सकारात्मक रुग्णाकडून प्रामुख्याने गर्दीत निकटचा संबंध आल्याने फैलावतो असे वैद्यकीय शात्राचे ठाम मत आहे. अशा परिस्थितीत या बंदिस्त कैद्यांना कोरोनाची लागण कशी झाली याबद्दल आता जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे मत मांडून चव्हाण म्हणतात, कोरोना टाळण्यासाठी जनतेने गर्दी करु नये म्हणून टाळेबंदीच्या माध्यमातून अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे देशाचे आर्थिक चक्रच दिवसेंदिवस खोल रुतत चालले आहे. सामान्य माणसांना एक वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. त्यांच्या शरीराचे पुरेशे पोषण होत नाही. या परिस्थितीत तो कोरोना हा विषाणू अस्तित्वात असेल तर त्याचा कसा निभाव लागणार.या परिस्थितीत बंदिस्त कारागृहातील या कैद्यांना कोरोनाची लागण कशी झाली याबाबत जनता आता एकमेकांना प्रश्न विचारत आहे. कोरोना हा विषाणू खरोखरच अस्तित्वात आहे की हा जागतिक स्तरावरील बागलबुवा आहे याबाबत तो साशंक झाला आहे. त्यामुळे आता या घटनेची कारणमीमांसा होऊन जनतेला सत्य समजले पाहिजे, अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त केली जात आहे, असे मत चव्हाण यांनी पत्रकात मांडले आहे.

You cannot copy content of this page