मालवणात पोलिसांची धकड कारवाई सुरूच…

बुधवारी दिवासभरात ६० व्यक्तींवर कारवाई : पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांची माहिती_

*💫मालवण दि.०३-:* विनामास्क फिरणे, अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणे, वाहन चालवताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे याप्रकरणी मालवण पोलिसांनी बुधवारी दिवसभरात धडक कारवाई करत ६० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. यात विनामास्क फिरणे, अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्या ४० व्यक्ती तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी दिली. मालवण तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस व होमगार्ड पथकाने ही कारवाई केली.

You cannot copy content of this page