माजी नगरसेविका सुलभा बाणावलीकर यांचे निधन…

*💫मालवण दि.०३-:* मालवणच्या माजी नगरसेविका आणि मालवण बाजारपेठेतील प्रसिद्ध क्षुधा शांती निवास या हाॅटेलच्या मालकीण श्रीमती सुलभा गुरुनाथ बाणावलीकर (वय ८१) यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने कुडाळ येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष गुरुनाथ उर्फ पप्पा जयवंत बाणावलीकर यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले होते. अवघ्या तीन दिवसांत पती पाठोपाठ पत्नीचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कुडाळ मधील प्रसिध्द डॉक्टर निलेश बाणावलीकर यांच्या त्या मातोश्री होत. आघाडी साप्ताहिकाचे संपादक नंदकिशोर महाजन यांच्या त्या सासू होत.

You cannot copy content of this page