कणकवली तहसीलदार आर. जे .पवार यांनी दिली माहिती_
*💫कणकवली दि.०३-:* कणकवली तालुक्यात किरोणाचा वाढता प्रादूर्भाव दक्षता म्हणून कणकवली तहसीलदार कार्यालयात हे फक्त आणि फक्त अत्यावश्यक कामासाठीच सुरू राहणार असल्याची माहिती कणकवली तहसीलदार आर. जे .पवार यांनी दिली आहे. कणकवली तहसीलदार आर. जे .पवार म्हणाले, कणकवली तहसीलदार कार्यालय येथील सेतू केंद्र तसेच व इतरही विविध कार्यालय क यातील कर्मचारी यांना करुणाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून लॉगडाऊन पर्यंत हे तहसील कार्यालय बंद असणार आहे व अति अत्यावश्यक जर काम असेल तर त्यांची आर टी पी सी आर टेस्ट झालेली असेल तर त्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने ही या सूचनांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक येणाऱ्या नागरिकास त्याची आरटीपीसीआर टेस्ट झाली आहे काय ? व अति अत्यावश्यक काम आहे काय ?याचा विचार करूनच त्याला प्रवेश दिला जाणार असल्याचे कणकवली तहसीलदार आर. जे .पवार म्हणाले
