उपसरपंच प्रमोद घाडी यानी केले उद्घाटन
*💫कणकवली दि.०३-:* मालवण तालुक्यातील श्रावण येथील महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 या शाळेत कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन गावचे उपसरपंच प्रमोद घाडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मालवण तालुक्याचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव हे उपस्थित होते. त्यांच्या समवेत पं.स.चे कृषी विस्तार अधिकारी संजय गोसावी, श्रावण गावचे झोनल ऑफिसर नितीन कदम, ग्रामविस्तार अधिकारी व्हि.व्हि. रावले, आरोग्य सेविका सुनिता डवरी, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया यादव, कृषी सहाय्यक अश्विन कुरकुटे, ग्रामपंचायत कर्मचारी बापू परब, मोहन परब, रंजन पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जयेंद्र जाधव यांनी श्रावण कोवीड केअर सेंटर बाबत समाधान व्यक्त करत गाव कृती कमिटी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. श्रावण शाळेचा स्वच्छ सुंदर परिसर पाहून सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. यावेळी नितीन कदम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करुन या कोवीड केअर सेंटरमुळे आता बाधितांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची ग्वाही दिली. तर व्हि.व्हि. रावले यांनी आभार मानले. हे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यासाठी शाळा वर्ग परिसर साफसफाईचे सर्व व्यवस्थापन सरपंच प्रशांत परब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, अनिल पवार, भवानीप्रसाद मुद्राळे, बापू परब, मोहन परब, रंजन पवार यांनी मिळून केले आहे.
