अति तात्काळ शाळा दुरुस्ती लवकरच

उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची माहिती;माटने येथे विलगिकरण कक्षाचे केले उद्घाटन

*💫दोडामार्ग दि.०३सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुका तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक शाळांच्या दुरुस्तीसाठी आलेल्या असून त्यासाठी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधीची कमतरता जाणवते आहे. मात्र शाळेची आवश्यकता पाहता त्या दुरुस्त होणे आवश्यक असून त्यामध्ये अती तात्काळ दुरुस्ती असलेल्या शाळांची दुरुस्ती लवकरच जिल्हा परिषद शिक्षण विभागा मार्फत केली जाईल असे जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आज माटणे येथे सांगितले. म्हापसेकर पुढे म्हणाले की, दुरुस्तीचे अनेक प्रस्ताव हे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आलेल्या असतात मात्र यातील काही दुरुस्तीही किरकोळ असते याची योग्य ती शहानिशा करून ज्या शाळांना अति तात्काळ दुरुस्तीची आवश्यकता आहे अशा शाळा लवकरच दुरुस्त केल्या जातील. जिल्हा परिषदची माटणे येथील शाळेच्या एका वर्गखोलीचे छप्पर मोडकळीस आलेले असून येथील शिक्षकांनी सदर शाळेची परिस्थिती जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर हे ग्राम विलगीकरण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी शाळेत आले असता त्यांना दाखवून दिली यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधत म्हापसेकर यांनी अशा अति तात्काळ दुरुस्ती असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील शाळांची दुरुस्ती लवकरच हाती घ्यावी असे सुचविले आहे

You cannot copy content of this page