विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये घबराट*
*💫वेंगुर्ला दि.०२-:* कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस सर्वत्र वाढत असल्याने त्याला प्रतिबंध घालण्यासाठी रेडी गावात आज रॅपिड टेस्ट केली असता एक जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दररोज कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रेडी गावात शासनाच्या नियमचे उल्लंघन करणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची आज रेडी ग्रामपंचायत मार्फत ३४ नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली यात एक व्यक्ती कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. रेडी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई रेडी गावात करण्यात आली यावेळी २४ एजंट तर आर्टिफिशिअल टेस्ट तर दहा आरटीपीसी आर टेस्ट करण्यात आल्या यात एका व्यक्तीचा कोरोना विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला यावेळी ग्राम कृती समितीचे अध्यक्ष तथा सरपंच रामसिंग उर्फ भाई राणे उपसरपंच नामदेव राणे ग्रामसेवक पी आर इंगळे तलाठी सोळंकी कृषी अधिकारी श्रीमती तांडेल आरोग्य सेवक मुरलीधर गवंडे ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य सेविका आदी कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते या दरम्यान कोरोणा विषाणू चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी विनाकारण फिरू नये असे आवाहन सरपंच रामसिंग राणे व उपसरपंच नामदेव राणे यांनी केले आहे.
