देवगड बंदरातील परप्रांतीय नौकेवर पहाऱ्यासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करा

मत्स्यव्यवसाय विभागाची देवगड पोलिसांकडे मागणी

*💫देवगड दि.०२-:* कारवाई करून देवगड बंदरात सुरक्षिततेसाठी आणून ठेवलेल्या परप्रांतीय नौकेवरील खलाशी पळून जाण्याचा तयारीत असल्याने पहाऱ्यासाठी नौकेवर पोलिस कर्मचारी नियुक्त करा, अशी मागणी मत्स्यव्यवसाय विभागाने देवगड पोलिसांकडे केली असून यामुळे कारवाई केलेल्या नौकांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र सागरी जलधी क्षेत्रात प्रवेश करून बेकायदेशरीपणे मच्छिमारी करताना मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर व त्यांच्या सहकारी टीमने निवती समुद्रात रिध्दी सिध्दी(उडपी, कर्नाटक) या परप्रांतीय नौेकेवर कारवाई करून मालवण अवरूध्द करून नौका ठेवली होती. या नौकेला २२ लाख ३७ हजार ७९५ एवढी दंड झाला होता.मात्र हा दंड भरणे शक्य होणार नाही असे सांगून नौकामालकांनी अद्यापपर्यंत दंड भरला नाही.या नौकेवर सात खलाशी असून सध्या ही नौका सुरक्षिततेसाठी देवगड बंदरात ठेवण्यात आली आहे.मात्र दोन महिने कारवाई करून बंदरात उभ्या असलेल्या नौकेवरील खलाशांना आता घरी जाण्याची ओढ लागली आहे.सर्व खलाशी पळून जाण्याचा तयारीत असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर या नौकेवर पहारा करण्यासाठी कर्मचारी द्यावा अशी मागणी मत्स्यव्यवसाय विभागाने देवगड पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page