करंजेतील तौक्ते बाधिताना भाजपच्यावतीने सीमेंट पत्रे

तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच मंगेश तळगांवकर यांच्याहस्ते विवितर

कणकवली : तालुक्यातील करंजे गावातील तौक्ती वादळग्रस्त कुटुंबांना भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच मंगेश तळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिमेंट पत्रे वाटप करण्यात आले. करंजे गावातील गजानन करंजेकर, विजय करंजेकर, वनिता करंजेकर, चंद्रकांत परब यांच्या छप्पराचे सिमेंट पत्रे वादळात फुटले होते. भाजपाच्या वतीने त्यांना मोफत सिमेंट पत्रे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, गणेश परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page