*ऑफिसर मी होणारच! या सामान्यज्ञान स्पर्धेत वैभववाडीतील आई – मुलाचे घवघवीत यश

*लहान गटात मुलगा दुसरा तर खुल्या गटात आईने पटकावला चतुर्थ क्रमांक*

*💫बांदा दि.०१-:* डॉट कॉम्स असोसिएशन, कुडाळ मार्फत आयोजित जिल्हास्तरीय मी ऑफिसर होणारच ! या सामान्यज्ञान स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेचा इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी कु.आयुष नाळे याने द्वितीय क्रमांक पटकावला.तसेच खुल्या गटात वैभववाडी येथील आयुषची आई सौ.मेघा प्रदीप नाळे यांचा चतुर्थ क्रमांक आला. कु.आयुषला मुख्याध्यापिका सुप्रिया शेटये,प्रफुल्ल जाधव,अमोल येणगे,प्रदीप नाळे यांचे मार्गदर्शन लाभले. आयुषच्या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे,विस्तार अधिकारी निसार नदाफ,केंद्रप्रमुख शिवाजी पवार,शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले.माय लेकाने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page