माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर दोन महीने वेतनाविना

*💫वेंगुर्ले दि.०१-:* माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे दोन महिन्याचे वेतन अध्यापही न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांची एप्रिल व मे 2021 या दोन महिन्याचे वेतन अद्यापही शासनाकडून मंजूर झाले नाही. एप्रिल महिन्याची वेतन देयके ऑनलाइन सादर करून दोन महिने उलटले तरीही वेतन होत नसल्याने शिक्षक-शिक्षकेतर यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मासिक वेतन देयके ही वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाकडून मंजुरीसाठी कोषागारात पाठवली जातात परंतु कोषागारकडे अनुदान प्राप्त नसल्याने शिक्षक-शिक्षकेतर यांचे पगार होऊ शकले नाहीत असे समजले आहे सलग दोन महिने वेतन नसल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे लवकरात लवकर पगार व्हावे अशी सर्वांची मागणी आहे. एप्रिल महिन्याचा पगार अद्यापही न झाल्याने तसेच गेल्या कित्येक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा होत असल्याने त्यांना बँक व पतपेढीच्या कर्जाला सामोरे जावे लागत आहे प्रत्येक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडे कर्ज असल्याने त्यांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे हप्ते थकल्याने बँकाकडून नोटिसा येत आहेत.तरी सर्व कर्मचाऱ्यांचे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पगार व्हावे अशी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी आहे

You cannot copy content of this page