रुपेश पावसकर:दोडामार्ग येथे भंडारी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव..
⚡कुडाळ ता.०७-: भंडारी समाज बांधवांसाठी जिल्हा परिषद मार्फत कुठलीही मदत भासल्यास आपण नेहमीच तुमच्या सोबत असेन. आपल्याला कधीही हाक द्या मी तुमच्यासाठी कार्यतत्पर राहीन असे प्रतिपादन जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी केले. दोडामार्ग तालुका भंडारी समाजाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी समाज बांधवांना संबोधित करताना ते बोलत होते.
नेरुर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी दहावी बारावीतील उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात आपण चांगल्या पदावर जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आपल्या समाजासाज नाव पुढे आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रात आपले समाज बांधव पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ आपल्या पाठीशी असेल असे सांगत दोडामार्ग तालुका समाजाचे उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले.
यावेळी दोडामार्ग तालुका भंडारी समाजाच्या वतीने रुपेश पावसकर यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर, कार्याध्यक्ष शेखर(राजू)गवंडे, माजी अध्यक्ष रमण वायंगणकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समील जळवी, उपाध्यक्ष विठोबा पालयेकर, दोडामार्ग तालुका अध्यक्ष मोहन गवंडे, महिला प्रतिनिधी कवठणकर मॅडम आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
