सावरवाड येथील लसीकरण मोहिमेचा।पंढरीनाथ राऊळ यांच्या हस्ते शुभारंभ…
*💫सावंतवाडी दि.३०-: सावरवाड येथे प्राथमिक शाळेत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंढरीनाथ राऊळ यांच्या हस्ते झाला. यावेळी कोविशीलडचे ११० डोस देण्यात आले. यावेळी सावंतवाडी माजी सभापती रवींद्र मडगावकर, सावरवाड सरपंच सुप्रिया मडगावकर, उपसरपंच तेजस्विनी कुडतरकर, पोलीस पाटील विठ्ठल डोईफोडे डॉक्टर कु.विद्या खरात, आरोग्य सहाय्यक श्री. नाईक, रघुनाथ पवार, आनंद वर्दम, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी गुंजाळ उपस्थित होते.
