“त्या” व्हायरल व्हिडिओची पोलिसांनी करावी चौकशी

*मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मागणी

*💫सावंतवाडी दि.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील सद्या आजी माजी लोकप्रतिनिधींचा एक अश्लील व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून, या व्हिडीओ मुळे जिल्ह्याची बदनामी होत आहे. त्यामुळे सबंधित प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तो तपास करून कारवाई करावी अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी ते म्हणाले की, सबंधित महिलेवर याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा दबाव होता का याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी देखील त्यानी केली आहे. पुढे ते म्हणाले की, या प्रकारामुळे सर्वच राजकीय पक्षांना भविष्यात धोका असून, कोणतीही महिला राजकारणात येण्यास तयार होणार नाही. यासाठी आजच सावंतवाडीतील मनसेचे पदाधिकारी पोलिस स्टेशनला निवेदन देऊन याबाबत लक्ष वेधणार असल्याची माहिती उपरकर यांनी दिली आहे. तसेच यावर योग्य ती कारवाई न झाल्यास मनसे आपली पुढील भूमिका स्पष्ट करेल असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page