राज्य सरकारने तौक्ते ग्रस्ताची चेष्टा केली आहे

भरिव मदत न दिल्यास तीव्र आंदोलन उभारणार;देवबाग येथे पाहणी दरम्यान खा नारायण राणेंचा इशारा

मालवण दि प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात किनारपट्टी भागातील ग्रामस्थांच्या घरांचे, झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत.तर काही घरांच्या चुलीही पेटलेल्या नाहीत. नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतात टाटा करून पंधरा मिनिटांत निघून जातात. त्यामुळे सरकारने या आपद्ग्रस्तांना अल्प भरपाई देत त्यांची चेष्टा न करता भरीव नुकसान भरपाई द्यावी अन्यथा या सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा भाजप नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी देवबाग येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला. हा इशारा देतानाच हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. एवढ्या वर्षात आमदार, खासदार देवबागचा बंधारा का बांधू शकलेले नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी केला. आज मालवण दौर्‍यावर आलेल्या खासदार नारायण राणे यांनी देवबागला भेट देत चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांची विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, बाबा परब, संतोष लुडबे, बाबू बिरमोळे, भाई मांजरेकर,राजू बिडये, उपसभापती राजू परुळेकर, महेश मांजरेकर, यांच्यासह स्थानिक भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. देवबाग येथे पत्रकार परिषदेत बोलताना श्री.नारायण राणे म्हणाले, चक्रीवादळ जे झाल त्या चक्री वादळामध्ये ज्यांची घरे नादुरुस्त झाली, ज्यांच्या घरात पाणी शिरले त्या घरांचे थोडक्यात नुकसान झाले. काही लोक बेघर झाले, घरात लहान मुले आहेत परंतु अन्न शिजवता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारकडून नुकसानीची दखल घेतली जावी, मुख्यतः सुरक्षिततेचा तसेच इथल्या राहणाऱ्या माणसांजे प्रश्न आहेत ते निकाली निघावेत यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे सांगून ते म्हणाले, आपण १९९१ साली जो बंधारा बांधला तो आज पूर्णतः खचला आहे. परिणामी समुद्राच्या लाटांचे पाणी घरात घुसून भिंती व घरे कोसळत आहेत. त्यामुळे आपली सरकारकडे मागणी आहे की त्यांनी त्वरित बंधार्‍याचे काम हाती घ्यावे. दोन्ही बाजूने बंधार्‍याचे काम करून ग्रामस्थांचे संरक्षण करावे. काही लोकांची घरे कोसळली आहेत. त्यांचे व्यवसाय उपजीविकेचे साधन गेले आहे. त्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी जेणेकरून ते पुन्हा उभे राहतील. ते म्हणाले, जी नुकसान भरपाईची माहिती मिळत आहे. त्याबाबत शासन निर्णय निघाला नाही. वाटप सुरू नाही. माडाला २५० रुपये मदत दिली जाणार आहे. प्रत्यक्षात एक माड वर्षभर कुटुंबाला पोसतो. त्यामुळे शासनाने तुटपुंजी मदत देत सर्वसामान्यांची चेष्टा करू नये. किमान दोन लाख रुपये एका माडाचे मिळावेत, घराच्या दुरूस्तीला लागणारी रक्कमेचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी. दीड लाखात घर होत नाही. ५० हजारात दुरूस्ती होत नाही. सरकारने जे दर निश्‍चित केले ते योग्य नाहीत. मागील वेळी २५ कोटी जाहीर केले. मात्र ५० लाख रुपयेही दिले नाहीत. उद्धव ठाकरे येतात टाटा करून पंधरा मिनीटात निघून जातात. त्यामुळे नुकसानग्रस्तांना भरीव नुकसान भरपाई न दिल्यास सरकार विरोधात तीव्र आंदोलन उभारू सध्या जी गावागावात मदत केली जात आहे ती पुढार्‍यांकडून होत आहे. त्यामुळे या सत्ताधार्‍यांना मी उघडा पाडल्या शिवाय राहणार नाही असेही श्री. राणे यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा किल्ले सिंधुदुर्गवासियांनाही बसला. यात घरांची, मंदिरांची कौले उडून गेली. शिवराजेश्‍वर मंदिरावर वडाचे झाड पडून नुकसान झाले. त्याचबरोबर वीज खांब कोसळून वीजपुरवठाही खंडित झाला. गेले अकरा दिवस किल्लावासिय अंधारात आहेत. याबाबत श्री. राणे म्हणाले, महावितरणच्या अधिकार्‍यांशी आपण चर्चा केली असून आज सायंकाळपर्यत देवबागसह किल्ले सिंधुदुर्गवरील वीजपुरवठा पूर्ववत होईल. शिवाय जे पंचनामे करायचे आहेत तेही लवकरच पूर्ण होतील असे श्री. राणे यांनी स्पष्ट केले. *चौकड वापरा* *छत्रपतींनी राजीनामा देऊ नये-राणे* मराठा आरक्षणाच्या विषयावरून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत श्री. राणे यांना विचारले असता ते म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्‍नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राजीनामा देऊन प्रश्‍न सुटणार नाही. त्यांनी जी मोहिम हाती घेतली ती भाजपमध्ये राहून घेतल्यास नक्कीच आरक्षण लवकर मिळेल. राजीनामा न देता योग्य व्यक्तींना भेटलात ज्यांच्यात आरक्षण देण्याची क्षमता आहे तर प्रश्‍न सुटू शकतो. त्यामुळे कृपया राजीनामा देऊ नये अशी छत्रपतींना विनंती असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले. *आठ दिवसात किल्ला वासीयांना रेशनिंगचे धान्य मिळणा

You cannot copy content of this page