नगरपालिकेच्या आरोग्य सभापती दर्शना कासवकर यानी दिली माहिती
*💫मालवण दि.२८-:* कोविड रुग्ण मृत झाल्यावर मृतदेहाचे योग्य पद्धतीने दहन होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ज्या ठिकाणी अशी गरज होती त्या ठिकाणी नगरपालिका सफाई कर्मचारी जावून योग्य पद्धतीने दहन करत होते. पालिकेमध्ये मुळातच कमी सफाई कामगार असल्याने शहर स्वच्छतेवर परिणाम होत होता. त्याच प्रमाणे काही नगरपालिका सफाई कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आल्याने याचा विचार करुन कोविड रुग्ण मृतदेह दहनासाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्यात येणार असल्याची माहिती मालवण नगरपालिकेच्या आरोग्य सभापति दर्शना कासवकर यानी दिली . कासवकर म्हणाल्या, मृत कोविड रुग्ण दहनासाठी काम करण्यासाठी आवश्यक असणारी निविदा नगरपालिकेने प्रसिद्ध केली असून ही निविदा भरण्यास इच्छुक असणाऱ्यांनी निविदा भरण्यासाठी मालवण नगरपालिकेडे संपर्क साधावा. तसेच ज्याना कोविड मृत व्यक्तिचे दहन स्वतः करायचे असेल त्यांनी नप आरोग्य विभागाकडे पीपीइ किट मागणी करून घेवून जावे. किट मोफत पुरविले जाईल. शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व ऑक्सिजन सिलिंडर मागणीचा विचार करता तुरंत १० जम्बो सिलिंडर उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच गरजे प्रमाणे जादा सिलिंडर खरेदी केले जाणार आहेत. या बाबत निविदा प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती दर्शना कासवकर यांनी दिली
