वैभवी कानडे यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा अपघात योजनेचा लाभ

वाडा बँक ऑफ इंडिया शाखेने केले दोन लाखाच्या धनादेशाचे वितरण

*💫देवगड दि.२८-:* प्रधानमंत्री जीवन ज्योतीबिमा अपघात योजनेअंतर्गत नाडण येथील वैभवी कानडे यांच्या वारसांना या योजनेअ्रंतर्गत 2 लाख रुपयांचा धनादेश बँक ऑफ इंडिया वाडा शाखेतर्फे देण्यात आला. यावेळी वाडा बँकेचे बँक मॅनेजर भास्क्रर खाडीलकर,सरपंच विजय पुजारे,स्टार युनियन सिंधुदुर्गचे मॅनेजर मकरंद नाईक,स्टार युनियन देवगडचे मॅनेजर सर्पराज मेमन,कृषी अधिकारी किरण हडपे,निलेश आचरेकर आदी उपस्थित होते. वैभवी कानडे यांचे वाडा येथील बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये खाते होते. या खात्या अंतर्गत त्यांनी प्रधानमंत्री जीवनबिमा अपघात योजनेमध्ये त्यांनी खाते काढले होते. कानडे यांचा एक वर्षापुर्वी अपघाती निधन झाल्याने त्यांच्या वारसांनी विश्वनाथ कानडे यांनी सदर बँकेमध्ये पाठपुरावा करुन तसेच बँक ऑफ इंडिया शाखा वाडा यांनी सदर लाभार्थींच्या वारसांना या योजनेअंतर्गत योग्य सहकार्य करुन रुपये 2 लाख रुपयांचा धनादेश वारसांना सुपुर्द करण्यात आला.

You cannot copy content of this page