परुळे पंचक्रोशीतील तौक्ते नुकसानी राजन तेलीनी केली पाहणी

*💫वेंगुर्ला दि.२८-:* तोक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यातील परुळे पंचक्रोशीत जे नुकसान झाले त्या परिसराची तसेच कर्ली व किल्लेनिवती येथील धुप्रतिबंधक बांधाऱ्याची माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पाहणी केली. यावेळी या भागात धूप प्रतिबंधक बंधारा व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यात सध्या भाजपतर्फे नुकसानग्रस्त ग्रामस्थांना मदत म्हणून विविध वस्तूंचे वाटप सुरु आहे. भाजप जिल्हाअध्यक्ष माजी आमदार राजन तेली हे परुळे येथे आले असता त्यांनी ग्रामस्थांच्या बरोबर पाहणी केली. यावेळी भाजप राज्य कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, माजी सभापती निलेश सामंत, मच्छिमार नेते वसंत तांडेल, तालुकाध्यक्ष सुहास गवडळकर, दादा केळुस्कर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, प्रदीप प्रभू, माजी चेअरमन प्रकाश राणे, गणपत माधव, रुपेश राणे, संतोष करलकर, राजू दूधवडकर, दिगंबर केसरकर, रमेश गावडे, विजय पाटकर, शेखर राणे, प्राजक्ता चिपकर, रक्षिता गोवेकर, दीपक दूधवडकर, आप्पा राठीवडेकर, सुभाष घोलेकर आदी उपस्थित होते. वादळमुळे कर्ली भागातील खाडीकिनारी असलेल्या घर व बागायती मध्ये समुद्राच्या भरतीचे पाणी घुसून नुकसान झाले होते. त्यामुळे त्या अनुषंगाने पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी किनारी धूप प्रतिबंधक बंधारा व्हावा अशी मागणी श्री. तेली यांच्याकडे केली.

You cannot copy content of this page