तीसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचे तज्ञाचे मत

या पाश्वभूमिवर जिल्ह्यात लहान मुलांसाठी कोविड सेंटर सुरु करा;राष्ट्रवादी अल्पसंख्यांकच्या सर्फराज नाईक यांची मागणी

*💫कुडाळ दि.२८-:* कोरोणाची तिसरी लाट लहान मुलांसाठी त्रासदायक आणि घातक असल्याचा दावा तज्ञ डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यात लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर निर्माण करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस सर्फराज नाईक यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जिल्ह्यात सद्य स्थितीत कोरोणाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असून हे आपल्या जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे. अशातच तिसरी लाट लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकेदायक आहे. सद्य परिस्थितीत आपल्या जिल्ह्यात लहान मुलांचे पॉझिटिव्ह केस वाढत चाललेले आहेत. आपल्या जिल्ह्यात सध्यातरी लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर उपलब्ध नाही ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर निर्माण करून त्यामध्ये लहान मुलांबरोबर पालकांचे राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी व इतर सहित्य उपलब्ध करून द्यावे, तसेच लहान मुलांचे डॉक्टरांचे टीम तयार ठेवण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस सर्फराज नाईक यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

You cannot copy content of this page