शहरात २ तर ग्रामीणात २४
*💫सावंतवाडी दि.२८-:* तालुक्यात आज २६ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात २४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात आज फक्त सावंतवाडीत २ रुग्ण सापडले असून, ग्रामीण भागात आंबोली २, दांडेली १, बांदा ३, शेरले १, कास १, गेळे १, चराठा २, कोलगाव ४, साटेली १, इन्सुली २, ओटवणे १, ओवळीये १, तळवडे ४ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ५३३ रुग्ण सक्रिय आहेत
