गुळदुवे शाळा नंबर १ समोरील रस्त्याच्या खचलेल्या भागाची दुरुस्ती कधी…?

ग्रामस्थांचा सवाल: वाहन चालकांची नाराजी..

⚡आरोंदा ता.२७-: सावंतवाडी रस्त्यावर गुळदुवे शाळा नंबर १ समोरील रस्त्याचा काही भाग गेल्या वर्षी कोसळला असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे.

याबाबत गुळदुवे ग्रामस्थांनी निवेदन देऊनही पावसाळा जवळ आला तरी या कामाकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी , वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वारंवार निवेदन देऊन ही या कामाबाबत दखल न घेतल्याने परत एकदा गावातील ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन संबंधित विभागाला दिले असून,या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की,आरोदा सावंत‌वाडी रस्त्यावरील गुळदुवे शाळेच्या च्या समोरील रस्त्याला धोकादायक वळण असून,वळणावरील २५ फुटांचा दरीच्या बाजूकडील रस्ता खचला असून वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे .त्याचे बांधकाम विभागाने प्राधान्याने काम करणे आवश्यक असल्यासबंधीचे निवेदन संबंधित विभाकडे यापूर्वी सादर केलेले आहे. पावसाळा तोंडावर आले‌ला असूनही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्याप झालेले नाही. येथील रहिवाशी किरण पेंडसे यांच्या घराजवळ हा रस्ता कोसळलेला आहे. त्यांच्या घराच्या बाजूने ३० फूट खोल दरी असून वाहन कोसळल्यास मनुष्य आणि वित्त हानी होण्याची शक्यता आहे.

तसेच शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, दुचाकी,चार चाकी वाहने, अवजड वाहने या मार्गावरून सतत ये- जा करत असतात.
सद्य स्थितीत पावसामुळे हा भाग कोसळण्याची शक्यता असून रस्त्याची पडझड झाल्यास वाहतूक बंद होऊन एखादी दुर्घटना होऊ शकते.
त्यामुळे संबंधित विभागाने संभाव्य धोक्यांचा विचार करून,पावसाळा सुरु होण्यापूर्वी तातडीने या रस्त्याच्या कोसळलेल्या मागाची दुरुस्ती करण्यासंबंधी कार्यवाही करानी.अशी मागणी येथील ग्रामस्थांनी,वाहनचालकांनी केली आहे.

You cannot copy content of this page