⚡मालवण ता.२७-:
भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी मालवण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे साजरी करण्यात आली. यानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच लहान मुलांना खाऊ आणि खेळणी यांचे वाटप तसेच नेहरू यांना आवडणाऱ्या गुलाब पुष्पाचे वाटपही मुलांना करण्यात आले.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण यांच्या मालवण बाजारपेठ येथील कार्यालयात जवाहरलाल नेहरू यांचा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्ग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, नयन महाजन, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, महिला शहर अध्यक्षा रुपाली फर्नांडिस, शिल्पा अंधारी, सारा फर्नांडिस, अक्षरा परुळेकर, क्रीजल मेंडीस व इतर कार्यकर्ते
उपस्थित होते.
